![]() |
| Courtesy: Pritesh Shinde |
सदर चित्र हे दुर्गसंवर्धन कार्यात सातत्याने आणि चिकाटीने काम करणारय़ा ’दुर्गवीर’ संस्थेच्या एका स्वयंसेवकाने म्हणजे श्री. प्रितेश शिंदे यांनी काढलेले आहे. हे चित्र येथे देत आहे. याचित्रात शिवकाळ, आजची आणि भविष्यातील काय परिस्थिती असेल असा भाव त्यामध्ये दाखवला आहे. यामध्ये बरयांच लोकांना वाटेल की खरचं असा होता का? खरचं अशी परिस्थिती आहे का? आणि भविष्यात असं होऊ शकते का? तर सगळ्याला उत्तर आहे, “हो”. शिवकाळात दुर्गांची निगा कशी राखत याबद्दल आज्ञापत्रात सगळे व्यवस्थितरित्या मांडलेले आहे. किल्य़ांची निगा याच प्रकारे अगदी १८१८ पर्यंत राखली जात होती. मगं इंग्रजांच्य़ा राजवटीत आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ यामध्ये जी अनास्था दिसते, त्याची साक्ष सध्या असलेली किल्यांच्या दुरावस्थेत दिसुन येते. मगं भविष्याचे काय ? हो जर आत्ताच आपणं लक्ष दिले नाही, शास्त्रिय पद्धतीने त्याचे संवर्धन केले नाहीतर पुढची पिढी नक्कीच म्हणेल की “खरचं किल्ले होते का?”
![]() |
| Rajgad BalleKilla - Kalpanik Chitra |
आज श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्य़ात आलेल्या कामातुन किल्याचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत. त्याच धर्तींवर एखादी वास्तू कशी असू शकते यांचे कल्पनाचित्र आमच्या एका कार्यकर्त्यांने रेखाटले आहे. जर असे स्वरुप पहावयाचे असल्यास नक्की या चळवळीमध्ये सामिल व्हा. आज पर्यंत मी अगदी पोटतिडकीने आवाहन करत आलो आहे. दुर्ग संवर्धन कार्य हे फक्त शासनाचे किंवा उन्हातान्हात राबुन काम करणारय़ा चार टाळक्यांच काय जवाबदारी आहे असे मानणारी मंडळी जास्त दिसतात. बरय़ाचदा अगदी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त लाईक किंवा चार, दोन मेसेज किंवा थंब्सअप असे चित्र संदेश देऊन आपले कार्य संपले असे मानणारे महाभाग सुद्धा आहेत. अशा व्यक्तींनकडे पाहिले की त्यांची कीव कराविशी वाटते.आज माझे सर्वांना आवाहन आहे की पहिले चित्र नीट पहा. स्वत: विचार करा. सद्य आणि भविष्यातील परिस्थीती बदलायची गरज आहे असे वाटल्यास, ज्याज्या ठिकाणी असे संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत त्याठिकाणी श्रमरुपी, आर्थिक किंवा पर्यावरण यांसारख्या कामात सहभागी होऊन आपण ही चळवळ अधिक सक्षम बनवा!!नाहितर आहेच फक्त राजांच्या नावाने घोषणा देणे, उत्सव-दिवस साजरे करणे, आपापले कॅमेरे विविध छायाचित्रांनी भरवणे आणि ब्लॉग लिहुन झोपणे.
आपला,
योगेश फाटक.
मो.क्र: +९१-९८२३३००७२४
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे.
॥ ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ॥
www.shivdurg.org


No comments:
Post a Comment