Sunday, May 31, 2015

शिवराज्याभिषेक दिन - ३१ मे २०१५

नमस्कार,



शिवराज्याभिषेक दिन म्हणजे एक वेगळी अनुभुती देणारी दिवस!!! रायगडावर जाऊन अनेक उत्साही मंडळीच्या समवेत अापल्या राज्याला ३५० वर्षांनंतरसुद्धा सिंहासनाधिश्वर होताना पहाताना छाती अभिमानाने फुलुन जाते.


पणं ज्या किल्यांच्यासाथीने हे हे अवघे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले त्यांवर असे दिन साजरे होतांना दिसत नाही. ज्यांना रायगडी आपली सेवा रूजू करता येत नाही त्यांनी आपल्या भागातील किल्यावर असे दिन साजरे केले पाहिजे या हेतुने श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने ३१ मे २०१५ रोजी रोहिडा दुर्गावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला.


यामध्ये मुख्यत्वे रोहिडा किल्याजवळील रामोशी वाडीमधिल तरुण लोकांनी पुढाकार घेतला. त्यांना साथ मिळाली ती मानकरवाडी, बाजारवाडी मधील तरूणांची!!! किल्यावर ७० लोकांनी रोहिडमल्लला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालुन किल्यावर राज्यांची पालखी मिरवली. हा एक अविस्मरणीय क्षण होता. सर्वजण एकमुखाने जयजयकार करीत दिन साजरा झाला!

रायगडा बरोबर आपल्या इतर किल्यावर सुद्धा असे दिन साजरा करूयात कारण भाग्यवान जरी रायगड असला तरी त्याचे भाग्य हे आपल्या इतर किल्यांनी लिहलयं!!!!



आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Saturday, May 30, 2015

अहवाल लेखन
खुपदा लोक विचारतात आपणं कशाप्रकारे आणि कोणकोणत्या कामांचे संकलन करुन अहवाल (Reports)  बनवता? 

संस्था ज्या किल्यावर कामे करिते त्यासर्वांचे विस्तृत माहीती देऊन अहवाल बनवते. किल्यावर येणारा खर्च, मोहिमेचे स्वरुप, केलेल्या कामांची माहीती; अशा विविध गोष्टींचे संकलन अहवालात असते. 

यापोस्ट बरोबर जोडलेली छायाचित्रे आपल्याला जास्त माहीती देतील.

आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Friday, May 22, 2015

भोर विभागाचे वन अधिकारी

                 श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.  कधी पुरस्काराच्या स्वरूपात तर कधी वस्तू रुपी दान देऊन, तर कधीतरी पाठीवर कौतुकाची थाप देऊन.
आज संस्थेने स्वयंम स्फुर्तीने तयार झालेले सभासद, देणगीदार छोट्या / मोठ्या औद्योगिक संस्था यांच्या माधम्यातुन या दुर्ग संवर्धन चळवळीसाठी लोक जोडले आहेत. तशाच प्रकारे शासनाशी सुसंवादाच्या माध्यमातून आम्ही माणसे जोडली आहेत. याची प्रचीती म्हणजे भोर विभागाचे वन अधिकारी
श्री. दिलीप झगडे साहेब यांनी संस्थेला ५०००₹ ची देऊ केलेली आर्थिक मदत.

रोहिडा किल्यावर कामाच्या परवानगी आणि केलेल्या कामाची माहिती देण्याच्या उद्देशाने आम्ही कायम यांना भेटतो. वन विभागात काम करत असताना त्यांच्या अनुभवाचा आम्हाला कायमच मदत झाली. नैसर्गिकरित्या लागलेला वणवा आटोक्यात कसा आणावा हे एक उदाहरणच म्हणून घ्याना!!!
कधी आमचा दृष्टीतून निसटलेली बाब सुद्धा अगदी साध्या शब्दात आम्हाला सागतात.

सध्या भोर वन खात्याने रोहिडा किल्यावरील विविध आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कामांना हात घातला आहे. त्यातून शासनाची ताकद काय असते याची प्रचिती सध्या किल्यावर चालू असलेल्या कामांच्या परिस्थितीतुन तुम्हाला अनुभवता येईल. तसे आजुन कोणत्या स्वरूपाची कामे हे खाते काम करू शकेल या दृष्टीने संस्थेने सदर विभागाला रितसर पत्र देऊन कामांची यादी देऊ केलेली आहे.



याचे औचित्य साधुन मला सगळ्यांना सांगावसे वाटते की, अशा विविध स्तरातून मिळत असलेल्या मदतीने आमचा आत्मविश्वास द्वीगुणीत झाला आहे.



श्री शिवदुर्ग संस्थेतर्फे श्री. झगडे साहेबांचे खुपखुप आभार.


आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Sunday, May 17, 2015

स्ट्रक्चरल ड्राइंग - किल्ले तिकोना





श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने किल्ले तिकोना येथे वास्तूंची आकृत्या तयार करण्याच्या दृष्टिने १६ मे २०१५ रोजी मोहिम घेण्यात आली. यामध्ये मुख्यतः शंकराचे मंदिर, कोरीव गुंफा यांची मापे घेण्यात आली. तसेच नुकतेच स्वच्छ केलेल्या वाड्यांच्या जोत्यांची सुद्धा मापे घेण्यात आली. संस्थेचे सभासद श्री विशाल ढमाले आणि श्री विशाल गोराणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम पार पडली. सध्या किल्याचा नकाशा बनवून त्या किल्यावर असलेल्या वास्तू, देऊळ, मुर्ती, गुंफा आणि चौथरे यांचे स्थल निश्चिती त्या नकाशात करण्यात येत आहे. पुढे भविष्यात संवर्धनाच्या कार्यात याचा उपयोग होईल अशी आशा संस्थेला वाटते.

दुर्ग संवर्धन म्हणजे किल्याची स्वच्छता, वृक्षारोपण किंवा पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे यावर सिमित न रहाता त्यांची स्ट्रक्चरल ड्राइंग आणि पर्यावरणाचे दस्तऐवज बनवणे असे उपक्रम पुढील वर्षांत करण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. पर्यावरण आणि पक्षीप्रेमी, आर्किटेक्ट, बाॅटनी या विषयाचे अभ्यासक आणि आवड असणारे या कामात सामिल व्हावे असे संस्थेतर्फे आवाहन करत अाहोत. इच्छुक व्यक्तींनी कृपया संपर्क साधावा.

कळावे,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ।।

Friday, May 15, 2015

"आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे"

६ मे दिवस उजाडला, रोहिडा किल्यावरील यारीचे परीक्षण करण्याचे दिवस ठरला होता. आमच्या संस्थेचे श्री हनुमंत देशमुख काकांनी एक इंडिजिनियस संकल्पनेतून ही यारी तयार केली होती. 
यारीचे सर्व गोष्टी आदल्या आठवड्यात किल्याच्या मध्यात चढवण्यात आल्या होत्या. यंत्राची जोडणी झाली आणि डिझेल इंजिनला चालू करण्यात आले. 
डिझेल इंजिन आर.पी.एम. पेक्षा आमच्या सर्वांच्या हृदयाचे आर.पी.एम. वाढले होते. यारीचा पहिला गेअर पडला आणि यारीची बकेट वर जायला लागली. 
काही काळातचं तिने ३० फुट उंची गाठली. सगळ्याच्या मुखावर आनंद दिसत होता पण काही वेळातच डिझेल इंजिन बंद पडले आणि सगळ्याचा ठोका चुकला. 
यारीची बकेट ५०-५५ फुटावर जाऊन मध्येच थांबली होती. डिझेल इंजिन चालू केले आणि काही मिनटातचं बंद झाले. काय झाले काय होतयं याची आम्ही कल्पनाकरे पर्यंत देशमुख काकांनी एकदम सागिंतले ५ बी.एच.पी. इंजिनची ताकद संपली. 
त्याच्याने हा किल्याचा चढ मटेरियल सकट पार करणे शक्य नाही. आपल्याला दुसरा पर्याय शोधणे लागले. आम्ही सगळे एकमेकांनाकडे पाहुन पुढं काय याचा विचार करू लागलो आणि काका म्हणाले मित्रांनो २५ बी.एच.पी. इंजिन लागणार.!!!! 

हे एक आम्हास आव्हानच होते, आता इतक्या शक्तीचे मशिन कुठं मिळणार त्याची किंमत काय असेल ही चर्चा पुण्यात गेल्यावर करू असे ठरवुन आम्ही किल्ला उतरलो. 
दुर्ग आणि त्याचे संवर्सधन याचे शिवधनुष्याचे आव्हान आम्ही स्विकारले आहे मगं हे आव्हान असे किती मोठे असणार. पण हे आव्हान पेलायचे आहे आणि आपल्याला हे काम पुढे नेयचे आहे असे ठरवुन आम्ही आपापल्या घरी गेलो.
संस्थेचे एकहाती सर्व जबाबदारी पार पाडणारे आणि पडेल ते काम हसतमुखाने करणारे श्री. पंडित अतिवाडकर, त्यारात्री कमी झोपले आणि सकाळ झाल्या झाल्या या मशिनची माहिती काढून कोणाकडे मिळू शकेल याची चाचपणी करू लागले. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला आणि एक प्रकाशबिंदू दिसला. जांभुळवाडी पथावर एक क्लीन ओ. डिझेल नावाची कंपनी आहे ती अशा डिझेल मशिनबद्दल चांगली माहिती देऊ शकेल असे कळाले. लगेचच देशमुख काका आणि पंडित या कंपनीच्या अधिकारी लोकांना भेटायला गेले. 
संस्थेचे काम आणि धडाडी पाहुन कंपनी अधिकारी स्तिमित झाले. त्यांना त्याचे किल्यावरील भ्रमंतीचे दिवस बहुदा आठवले असतील. श्री नातू आणि श्री सप्तर्षी साहेब म्हणाले आम्हाला तुम्ही जरा २ दिवसांनी निवांत भेटयला या! असा निरोप दिला. 
देशमुख काकांना आणि पंडित साहेबांना काही कळेना. बर चालेल म्हणून कंपनीतून बाहेर आले. दिन दिवसानंतर परत त्यांना भेटयला गेले तसे कंपनीच्या साहेबांनी केबिनमध्ये न नेता तडक दोघांना घेऊन वर्कशाॅप घेऊन आले. तेथे एक त्यांच्या कडे असणारे किर्लोस्कर कंपनी २५ बी.एच.पी. शक्तीचे मशिन ठेवलेले होते. त्याच्याकडे नातू साहेबांनी बोट दाखवून म्हणाले. हे इंजिन चालेल का?
आता फक्त आमच्या पायाखालची जमिन सरकायची बाकी होती. हे मशिन त्यांच्या कंपनीमध्ये पडून आहे. आणि या मशिन आता आम्ही वापरतात नाही. तुम्हाला सर्व्हिसिंग करून देतो तुम्ही हे घेऊन जा!!  असे म्हणाल्यावर आम्हाला  आमच्या कानावर विश्वास बसेना. 

"आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे" अशी आमची परिस्थिती झाली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या कंपनीचे श्री नातू साहेब म्हणाले अहो आम्ही श्री निनाद बेडेकर सरांबरोबर ट्रेकिंग केलयं. किल्यावर जाऊन तेथे काम करणारी तुमची संस्था एक जगावेगळी गोष्ट करत आहात. आम्हाला तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल खुप आस्था आहे आणि किल्यांच्या संवर्धनासाठी आम्ही काही मदत करावी म्हणून हे इंजिन तुम्हाला देत आहोत. कृपया याचा स्विकार करावा. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्याच्या संवर्धनासाठी आम्ही जेव्हा पासून सुरवात केली त्यादिवसापासुन कोणते काम पैसा, वस्तू किंवा श्रमदाना अभावी अर्धवट राहिले असे झालेले नाहीं. संस्थेला वस्तुरूपी मिळालेली ही देणगी आजपावतो सर्वात मोठी आहे.

संस्थेतर्फे या कंपनीचे मालक श्री. नातू आणि श्री सप्तर्षी साहेबांचे खुप खुप धन्यवाद. तसेच या कंपनीतील सर्व कर्मचारी यांचे आभार!!!! आम्ही आपले कायम ऋणी राहू आणि हे तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले काम पुन्हा नव्या ताकदीने पुढे नेऊ हे वचन आम्ही तुम्हाला देतो. 

आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ।।

खरचं किल्ले होते का?

Courtesy: Pritesh Shinde
नमस्कार मंडळी आज ज्यावेळेस लिहायला बसलो त्यावेळेला मुळात दोन लेख लिहण्य़ासाठी. दोन आठवडे मनात विचार करत होतो आणि दोन्ही विषय खुप महत्वाचे होते पणं कोणत्या लेखापासुन सुरवात करू हे कळत नव्हते. आज संकल्प केला आणि ठरवलं की ज्या चित्राने विचार करायला, अंतर्मुख व्हायला झाले त्याबद्दल आधी लिहावे.
                सदर चित्र हे दुर्गसंवर्धन कार्यात सातत्याने आणि चिकाटीने काम करणारय़ा ’दुर्गवीर’ संस्थेच्या एका स्वयंसेवकाने म्हणजे श्री. प्रितेश शिंदे यांनी काढलेले आहे. हे चित्र येथे देत आहे. याचित्रात शिवकाळ, आजची आणि भविष्यातील काय परिस्थिती असेल असा भाव त्यामध्ये दाखवला आहे. यामध्ये बरयांच लोकांना वाटेल की खरचं असा होता का? खरचं अशी परिस्थिती आहे का? आणि भविष्यात असं होऊ शकते का? तर सगळ्याला उत्तर आहे, “हो”. शिवकाळात दुर्गांची निगा कशी राखत याबद्दल आज्ञापत्रात सगळे व्यवस्थितरित्या मांडलेले आहे. किल्य़ांची निगा याच प्रकारे अगदी १८१८ पर्यंत राखली जात होती. मगं इंग्रजांच्य़ा राजवटीत आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ यामध्ये जी अनास्था दिसते, त्याची साक्ष सध्या असलेली किल्यांच्या दुरावस्थेत दिसुन येते. मगं भविष्याचे काय ? हो जर आत्ताच आपणं लक्ष दिले नाही, शास्त्रिय पद्धतीने त्याचे संवर्धन केले नाहीतर पुढची पिढी नक्कीच म्हणेल की “खरचं किल्ले होते का?”

Rajgad BalleKilla - Kalpanik Chitra

 आज श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्य़ात आलेल्या कामातुन किल्याचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत. त्याच धर्तींवर एखादी वास्तू कशी असू शकते यांचे कल्पनाचित्र आमच्या एका कार्यकर्त्यांने रेखाटले आहे. जर असे स्वरुप पहावयाचे असल्यास नक्की या चळवळीमध्ये सामिल व्हा.        आज पर्यंत मी अगदी पोटतिडकीने आवाहन करत आलो आहे. दुर्ग संवर्धन कार्य हे फक्त शासनाचे किंवा उन्हातान्हात राबुन काम करणारय़ा चार टाळक्यांच काय जवाबदारी आहे असे मानणारी मंडळी जास्त दिसतात. बरय़ाचदा अगदी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त लाईक किंवा चार, दोन मेसेज किंवा थंब्सअप असे चित्र संदेश देऊन आपले कार्य संपले असे मानणारे महाभाग सुद्धा आहेत. अशा व्यक्तींनकडे पाहिले की त्यांची कीव कराविशी वाटते.आज माझे सर्वांना आवाहन आहे की पहिले चित्र नीट पहा. स्वत: विचार करा. सद्य आणि भविष्यातील परिस्थीती बदलायची गरज आहे असे वाटल्यास, ज्याज्या ठिकाणी असे संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत त्याठिकाणी श्रमरुपी, आर्थिक किंवा पर्यावरण यांसारख्या कामात सहभागी होऊन आपण ही चळवळ अधिक सक्षम बनवा!!नाहितर आहेच फक्त राजांच्या नावाने घोषणा देणे, उत्सव-दिवस साजरे करणे, आपापले कॅमेरे विविध छायाचित्रांनी भरवणे आणि ब्लॉग लिहुन झोपणे.


आपला, 
योगेश फाटक. 
मो.क्र: +९१-९८२३३००७२४ 
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे. 
॥ ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ॥
www.shivdurg.org

www.facebook.com/shivdurg