Tuesday, June 30, 2015

"दुर्गराज राजगड"

राजांचा गड म्हणून आपल्याला माहित असलेला किल्ला म्हणजे "दुर्गराज राजगड". या किल्यांने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून पाहिले. स्वराज्याच्या चढता आलेख या किल्याने अनुभवलाही!!! जर दगडांना, डोंगरदरी, तटबुरुज यांना मृत्यू असता तर यांनी चित्रगुप्ताला अभिमानाने सांगीतले असते आम्हाला स्वर्ग नको कारण आम्ही आमच्या जीवनात छत्रपतींचा स्पर्श आणि सहवास अनुभवलाही याहून मोठे आम्हास स्वर्गात ते काय मिळणार!!! 🙏

पणं या किल्याची आजची परिस्थिती पहाता आपणं खुप कृतघ्नपणाची सिमा गाठली असे वाटते. आपणं जयजयकारातच आडकुन पडलो आहे असे भासते.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने राजगडावर २०१० सालापासून या किल्यावर संवर्धनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एक एक महिन्यात किल्यावरील विविध वास्तूंना पूर्नउजेडात आणण्यास सुरवात झाली. पाली मार्गातील २५४+ पायारी असो की पद्मावती माचीवरील वाड्यांची जोती, पाण्याचे स्त्रोत किंवा बुरुजांची स्वच्छता करण्यात आली.
       

 २०१२ सालात संस्थेने बालेकिल्यावरील वास्तूंच्या संवर्धनाकडे आपला मोर्चा वळवला. बालेकिल्याची स्वच्छता करताना बरयाच वास्तू स्वच्छ करण्यात आल्या. अंबारखाना, बाजारपेठे सारखे असणारे लागून असलेली वाडे स्वच्छ करण्यात आले.

      या संदेशांबरोबर जोडलेली छायाचित्र आपल्याला नक्कीच कामाचा आढावा देईल. अशा मोहिमात आपल्यासारख्या लोकांचा सहभाग असावा आणि ही दुर्ग संवर्धनाची चळवळ पुढे जावी या उद्देशापोटी हा लेखन प्रपंच!

बहुत काय लिहणे आपणं सुज्ञ असा!!!!


आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

No comments:

Post a Comment