Saturday, June 27, 2015

हीच आपली संस्कृती आहे काय?

नमस्कार,



भिंतीवर प्रेमिकेचे नाव टाकयची ज्यांना हौस आहे
त्यांनी त्यांच्या घरावर खुशाल टाका.
गडकिल्ल्यांच्याभिंतीवर नको...
ज्याच्या प्रेयसीचे नाव गडकोटावर दिसेल ती प्रेयसी
सार्वजनीक मालमत्ता समजली जाईल..
🚫
Forward fast..

एक कट्टर शिवभक्त ⛳



सकाळी सकाळी हा मेसेज पाहिला आणि मन उद्विग्न झाले. कट्टर शिवभक्त म्हणणारा हा व्यक्ती ना छत्रपती शिवाजी महाराजांना समजला ना स्त्रियांना!!!!

असे म्हणण्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीच्या वेळी स्त्रियांच्या संदर्भात अनेक प्रसंग उद्भवले. याचेच एक उदाहरण म्हणजे 'राझ्याच्या पाटिलाल सुनावलेली शिक्षा' शिवाजी महाराजांची न्यायबुद्धी आणि स्त्रियांच्या बद्दल असलेला आदर दाखवतात.

मुळात प्रेमिकांनी अशी नावे कोरणे ही निंदनीय प्रथा जगभर दिसते. मी अगदी न्यूयॉर्कला असताना, ऐंपायर स्टेट बिल्डिंगच्या ८८व्या माळ्यावर मी स्वतः पाहिले आहे. पिरामिड पाहिलेली व्यक्ती सुद्धा तिथे अशी नावे लिहलेली आहेत असे म्हणतात.

आता थोडे वळुयात आपल्या किल्याच्यांवर मजनू लोकांनी लिहलेली नावे. ही बाब सुद्धा नक्कीच निंदनिय आहे. ज्याकिल्यांचे स्वामित्व असलेल्या व्यक्तीने आपले नाव लिहले नाही तिथं असे आपल्या प्रेमाच्या खुणा सोडणे म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण आहे.


मुळात हा असा मेसेज प्रसरुत करण्याच्या डोसक्यात भुस्सा भरलेला आहे का असं वाटते. कारण ज्या मुलिचे नाव आहे तिला सार्वजनिक मालमत्ता म्हणणे म्हणजे तालिबानी असण्याचे द्योतक आहे. युद्धात जिकंल्यानंतर प्राप्त होणारी वस्तू आणि व्यक्ती वाटून घेणारे आपण अब्दाली आहात काय?

हीच आपली संस्कृती आहे काय?

 युद्धात जिंकल्यानंतर शत्रूंच्या साधारण / असाधारण स्त्रियांना मानाने वागवणारे आपले छत्रपतींची शिकवणुक विसरले का? हा प्रश्न निर्माण होतो. या मेसेजमध्ये स्त्रीयांबरोबर आपल्या राज्याचा अपमान केला आहे असे वाटते. दुसरी गोष्ट असे मजनू एकतर्फी प्रेमातुन लिहणारे असतात, यामध्ये मुख्यतः त्या स्त्री व्यक्तीला याची कल्पना सुद्दा नसते. त्यामुळे तीला संप्पत्ती ठरवणार???

यामेसेजमध्ये कट्टर शिवभक्त म्हणवणारा ना राज्यांना समजला ना स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाला.
असे नावे लिहण्याचे प्रकार किल्ला काय पण शहरात गावात सुद्धा दिसतात, यामध्ये मुख्यतः त्या स्त्रीला बदनाम करणे हा हेतू असतो.

त्यामुळे अशा शिवभक्तांची गरज आहे का? स्त्रियांना मालमत्ता मगं ती वैय्यतीक असो सार्वजनिक समजणारे हे नक्कीच शिवभक्त नव्हेत.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने जोडलेले लोक अशा समस्येवर तोडगा म्हणजे ती लिहलेली नावे खोडण्यासाठी ब्रश, पाणी आणि साबण घेऊन ती खोडण्यासाठी प्रयत्न करतात. माझ्या दृष्टीने हे खरे कट्टर शिवभक्त. अशा व्यक्तींनी किल्ले तिकोना, रोहिडा, राजगडावर मोहिमा घेऊन स्वच्छता केली आहे. चुन्यापासुन अगदी आॅईल पेंटने रंगवलेली नावे काढण्यात आली. यासाठी चिंचेचा कोळ वापरण्यात आला. तसेच काॅस्टिक सोडा वापरून न जाणारे रंग काढण्यात आले आहेत. (काॅस्टिक सोडा वापरण्याच्या पद्धती आहेत. त्याचा वापर करण्याआधी कृपया जाणकारांचे मत घ्यावे. सगळीकडे हे वापरावे लागतेवासे ही नाही.)


आपणं ठरवा कोणत्या प्रकारातील शिवभक्त व्हावे!!



आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

No comments:

Post a Comment