Saturday, June 13, 2015

रोहिडा गडाला हिरव्या शालूने अलंकारीत करणे

नमस्कार,


वार  शनिवार                                      स्थळ रोहिड गड



मोहिम :  रोहिडा गडाला हिरव्या शालूने अलंकारीत करणे व गडावर काम करणाऱ्या लोकांना गादी वाटप तसेच त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करणे.


सहभागी कार्यकर्ते: योगेश फाटक, महेश नेलगे, मुदगल काका, अमोल हळबे, निलेश वडके, पैठणकर, दर्शन वाघ, व नविन कार्यकर्ते ठाकुर व मिसाळ

काल गडावर, व्रुक्षारोपणाच्या मोहिमेअंतर्गत जास्वंद, बहाव, परिजातक कदंब अशा एकुण 26 झाडांना त्यांची हक्काची जागा मिळवुन देण्याच्या कामी वरील सर्व कार्यकर्त्यांनी आपला कार्याचा वाटा उचलला, संस्थेच्या बरोबरीने वन खात्यानेही मुलाणी साहेब व त्याचे 6 गार्ड यांच्या मार्फत आपला सहभाग नोंदविला.
आपले सर्व गडपाल व गडावर काम करणारे सर्व कामगारही उपस्थित होतेच.
 का कोणास ठाऊक पण आपली संस्धा आणि वनखाते एकत्र येवून गडाला हिरव्या शालूने नटवतायत म्हटल्यावर सुर्य देवानेही आपला लाल रंग रोखून धरत देवदेवतांचा सहभाग नोंदविला.

याच बरेबरीने नक्षत्रवनातील जी वृक्षराजी आपण गेल्या वर्षभरापासून संभाळत आहोत, जोपासत आहोत, त्यांचे नामकरण तर फार पुर्वी नारद पुराण काळीच झाले आहे, पण त्याचा औपचारीक सोहळा काल पार पडला.

तसेच गडावरील इतर कामे, त्यांचे पाऊस काळातील नियोजन, गडावर सापडलेल्या वस्तूंची यादी तयार करणे, वनखात्याशी पुढील कामांबाबत चर्चा आदि कामातही सर्व उपस्थितांचा सहभाग लक्षणिय होता.

याच बरोबरीने एक कृतज्ञता म्हणुन गडावर काम करणाऱ्या कमगारांच्या मुलांसाठी शालेय साहीत्य वाटप व याच कामगारांना गडावर कष्ट करुन, थकून भानगु घरी आल्यावर विसाव्याचे साधन म्हणून गादी व उशी वाटपाचा कार्यक्रमही संस्थेने सोहळारुपी पर पाडला. गडावर शालेय सहित्य, वनखात्याचे श्री मुलाणी साहेब यांच्या हस्ते वाटण्यात आले, तर खाली आल्यावर गावातील देवादिकांच्या साक्षीने (मंदिरासमोर) सरपंचाच्या हस्ते गाद्या वाटपाचा कर्यक्रम संपन्न जाहला.

सर्व उपस्थित सभासद, गडकरी/गडपाल, वन खात्याचे कर्मचारी यांचे .

सकल चराचराला उजळविणाऱ्या सुर्यनारायणाचे व आमच्या भावभावना व बुद्धीचा ओढा गडाकडे नेणाऱ्या सर्व देवदेवतांचा ऋणी.

काही क्षणचित्रे....



आपला,
दर्शन वाघ.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
॥ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील॥
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

No comments:

Post a Comment